IMPACT वाकी नदी पात्रात अवैध गौण खनिजाचे उत्खनन – प्रांत अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

जामनेर

जामनेर तहसील अंतर्गत अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. काल दिनांक 10 जून 2025 रोजी  बेकायदेशीर पद्धतीने वाकी येथील नदीमध्ये अवैध पद्धतीने उत्खनन सुरू होते . मात्र पत्रकारांच्या सतरतेमुळे या अवैध गळून खनिज उत्खननाराला वाचा फुटली आणि उत्खनन करणारे पसार झाले.

वाकी येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते, मात्र यावर प्रशासनाची नजर गेली नाही का किंवा प्रशासनाने जाणून-बुजून काना डोळा केला असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातून तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी च्या साह्याने बेसुमार उत्खनन सुरू होते. पत्रकारांनी घटनास्थळी जाताच सर्वांनी तेथून पळ काढला.

वाकी येथील नदीमध्ये गणेश उत्सव आणि नवरात्रीमध्ये छोट्या मोठ्या मुर्त्या विसर्जित केल्या जातात मात्र या अवैध गौण खनिज उत्खननामुळे नदीमध्ये मोठ मोठे झालेले खड्डेच अनेक दुर्घटनांना कारण ठरत आहेत. तसेच अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी बातमीची दखल घेत तात्काळ जामनेर तहसील कार्यालयाला सदरील घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे

तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले की ,वाकी येथील नदी पात्रात होत असणारे उत्खनन यांची वाकीचे तलाठी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चुकीचा प्रकार असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours