जामनेर बस स्थानक येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोऱ्या आणि चुकीचे प्रकार पाहता आगार परिसरात तात्काळ सीसीटीव्ही बसवणे, त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना एसटी बस मध्ये आरक्षित जागेवर बसण्यासाठी मदत करण्यात यावी तसेच दिव्यांगांसाठी स्थानकावर व्हीलचेअर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणी संदर्भात आज विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देत मागणी करण्यात आली.
जामनेर बसस्थानकाच्या सुरक्षेबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, तक्रारीनंतरही दखल घेतली जात नसल्याची स्थिती आहे. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असतानाही बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बसस्थानकात चोऱ्या, तसेच महिलांची छेड काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. नव्याने अर्धवट झालेल्या बसस्थानकात बाहेरून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानकात उपाययोजना होणे आवश्यक आहे.
पोलिस कर्मचारीही लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रोडरोमिओंवर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळेच स्पष्ट करण्यात वढले आहे . यावर अंकुश लावण्यासाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, तसेच एसटी बस मध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित जागा असते, मात्र अनेकदा दिव्यांगांना या जागेवर बसण्यासाठी खटाटोप सहन करावा लागतो. आरक्षित जागेवर बसण्यासाठी बस वाहक आणि चालक यांनी दिव्यांगांना मदत करावी , तसेच दिव्यांग व्यक्तींना आगारात फिरण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागणीसाठी आज विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज जामनेर डेपो मॅनेजर नाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवन माळी , दिव्यांग नवी दिशा चे रवी झाल्टे अंबाबाई, अपंग एकता संघटनेचे संगीता जोशी ,यमुनाबाई ,जीवन राठोड सह इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.
डेपो मॅनेजर नाईक यांनी संबंधित निवेदनाची योग्य ती दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
+ There are no comments
Add yours