“झटक्याने दिला झटका”- विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील5 जणांचा मृत्यू

“झटक्याने दिला झटका”- एकाच कुटुंबातील 5 जणांना विजेचा झटका लागल्याने दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये एक दीड वर्षाची चिमुरडी थोडक्यात बचाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेत मालकास ताब्यात घेतले आहे.याच शेतामध्ये वन्य जीव जाऊ नये व त्यांनी पिकांचे नुकसान करणे यासाठी झटका तार लावण्यात आलेली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात मसाज रोडवर गट नंबर 21 या शेत आहे. या शेतात मध्यप्रदेश येथील एक कुटुंब कामासाठी आलेले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ही कुटुंब शेतातच वास्तव्यास होते. कुटुंबात दोन महिला, 42 वर्षीय पुरुष, आणि तीन मुल वास्तव्यास होते. आज महेश कुटुंब शेतात जात असताना त्यांना विजेच्या तारांचा स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा झटका बसला. या झटक्यातच ४० वर्षीय दोन महिला , ४५ वर्षीय एक पुरुष, 6 वर्षीय मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने दीड वर्षाच्या चिमुकला थोडक्यात बचावला आहे. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. हा अपघात आहे की घातपात याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब हे मध्य प्रदेश मधून वरखेडी येथे कामाला आले होते. शेतात जात असताना अचानक त्यांना विजेच्या तारांचा झटका बसला आणि त्यातच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदोष मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ज्या शेतमालकाने झटका मशीन लावली होती त्याला ताब्यात घेण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. मैदानचे अद्याप ओळख पटलेली नाही. 

घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठविण्यात आले असून शव विच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून ही दुर्घटना आहे की आत्महत्या, हत्या याचा तपास सुरु आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours