अल्पवयीन विद्यार्थनीची छेड काढणाऱ्याला अटक – पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
जामनेर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला असून, शेंदुर्णी येथील शाळा बस चालकावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अबिद हुसेन शेख (वय 41)हा विद्यार्थ्यांसाठी खाजगी बस चालवतो. चालक अबीद हुसेन शेख हा विद्यार्थिनींना वारंवार त्रास देत असे. मुलींना वाईट नजरेने पाहणे, मुद्दामहून स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, तसेच तू मला खूप आवडतेस अशा अश्लील स्वरूपाच्या टिप्पणी करणे अशी त्याची कृत्ये सुरू होती या स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे पीडित विद्यार्थिनीचा आरोपीने पाठलाग करत हात धरत छेडछाड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनी भीतीने गप्प बसली, मात्र नंतर कुटुंबीयांनी सर्व माहिती समजताच त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.या गंभीर प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात तक्रार देत पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, API कल्याणी वर्मा व PSI विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पालकवर्गामध्ये चिंता व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
+ There are no comments
Add yours