जामनेर शहरातील वाकी रोडवर आज दुपारी साडे १२ वाजता मोठा अपघात टळला. रेल्वे गेटच्या जवळ एक प्रचंड मोठ झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आज दुपारी साडे 12 बाजेच्या सुमारास अचानक एक झाड रस्त्याच्या मधोमध कोसळले. या दुर्घटनेत विजेचे तारे तुटून विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर नगरपालिकेकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्हीचे नुकसान झाले आहे. झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनावर कोसळल्याने वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. विशेष म्हणजे, झाडाजवळ उभी असलेली एक महिला थोडक्यात बचावली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर काही वेळ रस्ता रहदारीसाठी बंद झाला होता मात्र प्रशासनाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्ता तत्काळ सुरू करण्यात आला.
वाकी रोडवर अशी अनेक झाडे धोकादायक स्थितीत असून कधीही अपघात घडू शकतो. त्यामुळे तातडीने झाडांच्या फांद्या छाटण्याची किंवा धोकादायक झाडे तोडण्याची आवश्यकता आहे.नागरिकांनी जामनेर नगरपालिकेने या बाबीकडे त्वरित लक्ष द्यावे आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
+ There are no comments
Add yours