“तीन पिढ्यांचा साहित्यिक वारसा उजळला; साताऱ्यात शेंदुर्णीच्या गोपीचंद जावळेंचा सन्मान”

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोपीचंद जावळे यांची कविता सादर, साहित्यिक परंपरेचा गौरव

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी अ‍ॅड. गोपीचंद वसंत जावळे यांची कविता “प्रेम किनारा” हिची ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड झाली असून सातारा येथे आयोजित संमेलनातील कविकट्टा मंचावर त्यांनी काल, शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

या उल्लेखनीय साहित्यिक कामगिरीबद्दल अ‍ॅड. गोपीचंद जावळे यांना साहित्य संमेलनात शाल, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कविकट्टा मंचावर त्यांच्या कवितेने प्रेम, संवेदना आणि मानवी भावनांचा सखोल आविष्कार मांडल्याने श्रोत्यांमध्ये विशेष चर्चा रंगली.

गोपीचंद जावळे हे प्रसिद्ध कवी व गायक वसंत श्रावण जावळे यांचे चिरंजीव असून त्यांचे आजोबा श्रावण रामदायल जावळे हे देखील कवी होते. तीन पिढ्यांची साहित्यिक परंपरा लाभलेल्या जावळे कुटुंबाचा हा गौरव मानला जात आहे.

सध्या अ‍ॅड. गोपीचंद जावळे हे मुंबई महानगरपालिकेत (BMC) सहाय्यक कायदा अधिकारी वर्ग-१ या पदावर कार्यरत आहेत. व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत साहित्याची निष्ठेने जोपासना करत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मिळालेल्या मान्यतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून, हा सन्मान आपल्या कुटुंबाच्या साहित्यिक वारशाचा गौरव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours