माळपिंपरी, ता. जळगाव | प्रतिनिधी
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी (रविवार) माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरी येथे भेट देत रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषीदूत सुशांत जाधव, पवन बुवा, संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी या अभ्यासदौऱ्यात सहभाग घेतला.
प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच फलोत्पादन विभागाचे प्रा. के. ए. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी मधुरम नर्सरीचे संचालक योगेश पाटील यांनी रोपवाटिका व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करताना बियाणे व कलमांपासून रोपे तयार करणे, त्यांची निगा राखणे, सिंचन, खत व कीड-रोग नियंत्रण, तापमान व्यवस्थापन तसेच मार्केटिंगचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. यशस्वी नर्सरीसाठी नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर कृषीदुतांनी नर्सरीतील विविध प्रात्यक्षिके प्रत्यक्ष करून पाहिली. या अभ्यासपूर्ण भेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने उपक्रम उपयुक्त ठरला.
+ There are no comments
Add yours