जळगाव : खासदाराच्याच मुलीची छेडछाड, धक्काबुक्की – न्यायासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची पोलीस ठाण्यात धाव

जळगाव/मुक्ताईनगर -महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर मध्ये आदिशक्ती मुक्ताबाई ची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषीिका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले, याबाबत शंका येतात सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावे केली, या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत.

आदिशक्ती मुक्ताबाई ची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते या दिवशी कार्यक्रम असतो केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही फराळ वाटप करत होती, यावेळी देखील भोई नावाचा तरुण तिचा पाठला करत होता, त्यानंतर कृषीका काही यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणी बरोबर फिरायला गेली, यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला ते ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला व्हिडिओ चित्रित केले ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येतात त्यांनी त्याला मज्जाव केला, परंतु तो त्याच्या अंगावरती गेला, या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत या तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आले आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाले की आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय याबाबत मी मुख्यमंत्र्यांची ही चर्चा केली आहे असे त्यांनी सांगितले.

टवाळखोर मुलांविरोधात सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

गुन्हा घडूनही संबंधित आरोपींवर कोणताही कारवाई झालेली नाहीये. पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावे लागले. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. संबंधित घटनेच्या कारवाईची माहिती मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकांनी खडसे यांना दिली.

पुणे शहरात नुकतीच 26 वर्ष तरुणीवर बलात्काराची घटना घडली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला होता त्याचबरोबर आता जळगाव मधून देखील ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर राज्यातील महिला कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संशयित आरोपींची नावे आली समोर

अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांनी रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची माहिती मिळत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये या टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours